Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
abp majha web team | 22 Sep 2023 08:19 AM (IST)
सध्या राज्यात कांद्याचा प्रश्नानं व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत. सध्या कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद आहेत. यासंदर्भात आज दुपारी ३ वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची एक बैठक घेतली जाणारेय. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील 15 बाजार समितीतील लिलाव बेमुदत बंद ठेवलाय. याआधी पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आजच्या बैठकीत असोसिएशनची पुढची भूमिका स्पष्ट होणार आहे.