नाशिक | उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2018 12:35 PM (IST)
मागणीपेक्षा आवक वाढल्यानं नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे..टोमॅटोला मिळणाऱ्या दरापेक्षा उत्पादन खर्चही जास्त असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत..20 किलोंच्या एका क्रेटमागे शेतकऱ्याला 250 रुपये मिळत होते, मात्र सध्य़ा हाच दर 60 रुपये इतका झालाय..गेल्या काही वर्षात टोमॅटोच्या दरात झालेली ही विक्रमी घसरण मानली जातेय.. मागच्या वर्षाच्या जुलै महिन्याच्या मध्यावर टोमॅटोनं शंभरी पार केल्यानं उत्पादकांना अच्छे दिन आले होते. मात्र या वर्षी त्याच्या उलट परिणाम पाहायला मिळतोय. यंदा नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झाल्यामुळे दर घटल्याचं बोललं जातंय.