मुंबई | राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2018 12:15 PM (IST)
राज्यात दुष्काळसदृश नाही तर दुष्काळच घोषित करावा अशी परिस्थिती आहे., असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली. तांत्रिकदृष्टया संपूर्ण दुष्काळ घोषित करता येत नाही, म्हणून दुष्काळसदृश अशी टर्म वापरात आल्याची चर्चा आहे. मात्र ही निव्वळ फसावफसवी असून संपूर्ण दुष्काळा जाहीर करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनीही केलीय. दरम्यान, 180 तालुक्यांमध्ये टँकर, चारा, वीज, शालेय सवलती देण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.