Majha Vishesh | आपल्याला कोरोनाच्या चक्रव्युहात ढकललं कुणी?हा केंद्राचा की राज्य शासनाचा हलगर्जीपणा?
एबीपी माझा वेब टीम Updated at: 07 Sep 2020 08:21 PM (IST)
गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज नवा उच्चाक स्थापित होत आहे. प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढतच आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत, आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र, रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे की त्या व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे राज्यात अनेक तालुक्यात जनता कर्फ्यू घेण्यात येत आहेत.