माझा महाराष्ट्र 'माझा'ची जबाबदारी : कोरोना काळात तरुणांनी काय काळजी घ्यावी? डॉ. अनंत कुलकर्णी आणि डॉ. मनोज चोपडा
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2021 05:58 PM (IST)
मुंबई : राज्यात आज 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 949 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्क्यांवर पोहचला आहे. याआधी 10 मार्च रोजी 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली होती.
दरम्यान आज 477 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 96 हजार 198 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे.