Thackeray Brothers Rally | वरळी Dome मध्ये आज रात्री रंगीत तालीम, एंट्री ते आसनव्यवस्था नियोजन
abp majha web team | 04 Jul 2025 11:10 AM (IST)
मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची रंगीत तालीम आज रात्री आठ वाजता वरळी डोमला पार पडणार आहे. यात दोन्ही बंधूंची एंट्री कुठून असेल, कशी असेल याचं नियोजन आखलं जाणार आहे. ठाकरे बंधूंनंतर इतर महत्वाच्या नेत्यांचं नियोजन कोणत्या गेटने एंट्री आणि त्यांची आसनव्यवस्था कशी असेल, आसनव्यवस्थेपर्यंतचा मार्ग या अनुषंगाने सुद्धा नियोजन असेल. तसंच इतर पदाधिकारी यांच्या आसनव्यवस्था आणि प्रत्येक गेटला विशेष कलर कोडिंग असेल. कलर कोडच्या अनुषंगाने पासेसचं वाटपही केलं जाईल. मेळाव्याच्या तयारीचा हा भाग आहे.