Thackeray Alliance | राज ठाकरेंचा युतीबाबत सावध पवित्रा, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चित्र स्पष्ट
abp majha web team | 15 Jul 2025 12:18 PM (IST)
राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यादरम्यान निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर युतीसंदर्भात विचार करू असे राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. 'विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही' असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. एकीकडे ठाकरेंची शिवसेना युतीबाबत 'टाई' देत असताना, राज ठाकरे यांनी मात्र सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. या भूमिकेमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.