Pune Child Rescue : थरकाप उडवणारी घटना: 4 वर्षांची भाविका मृत्यूच्या दाढेतून वाचली! Special Report
abp majha web team | 08 Jul 2025 08:06 PM (IST)
पुण्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गुजर निंबाळकर वाडी येथे एका चार वर्षांच्या मुलीचा जीव धोक्यात आला होता. आईने मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी लहान मुलगी भाविकाला घरी एकटे ठेवून बाहेरून कुलूप लावले होते. काही वेळाने चिमुकली भाविका खिडकीत आली आणि लोखंडी सज्जावरून खाली उतरली. ती लोखंडी गजांना पकडून लटकत होती. उमेश सुतार नावाच्या शेजाऱ्याने ही बाब पाहिली आणि आरडाओरडा केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश चव्हाण, जे साप्ताहिक सुट्टीवर होते, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून मुलीला सुखरूप बाहेर काढले. "मुलगी भरपूर रडत होती कारण की तिला त्रास होत होता. मानेला किंवा हाताने पकडून ठेवलं होतं. मुलगी चार वर्षांची भाविका होती तर पण तिचा त्या गोष्टीसाठी जीव वाचविण्यासाठीचे तरपडणं हे मला पाहून अतिशय म्हणजे वेदनादायी वाटलं होते. त्यामुळे तिची मदत करण्यासाठी माझं मी कर्तव्य समजून मी त्याच ठिकाणी दाव घेतली," असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. योगेश चव्हाण वेळेत पोहोचले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे चिमुकल्या भाविकाला जीवदान मिळाले. एबीपी माझा योगेश चव्हाण यांच्या या कार्याला सलाम करतो.