Majha Vishesh Metro Car shed | संजय राऊतांच्या टिप्पणीमुळे नवा वाद? न्यायालयाला राजकारणात कोण ओढतंय?
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2020 08:24 PM (IST)
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर मार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकार पुन्हा कार शेड हलवण्याच्या तयारीत आहे. मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी राज्य सरकार करत आहे. यावर मेट्रोच्या विषयावरून शह काटशहाचा प्रयत्न केला जाऊ नये, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.