Officer Transfer Defiance : अधिकाऱ्यांचा आदेशाला 'खो', महसूल विभागाला फटका!
abp majha web team | 03 Jul 2025 08:58 AM (IST)
प्रतिनियुक्तीवर असलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले होते. मात्र, एकोणतीस अधिकाऱ्यांपैकी केवळ बारा अधिकारीच आतापर्यंत मूळ विभागात रुजू झाले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या या आदेशाकडे कानाडोळा केल्याचं दिसतंय. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतानाही अधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही अधिकारी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी 'क्रीम पोस्ट'वर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बदली मराठवाडा किंवा विदर्भात झाल्यास ते रुजू होण्यास तयार नाहीत. बदलीचे आदेश आल्यानंतर हे अधिकारी थेट राजकीय वर्तन वापरतात, ज्यामुळे ते वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी बसून आहेत. महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर योजना राबवायच्या असतील, तर लोकांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. महसूलमंत्र्यांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली होती, ज्यात जवळपास एकोणतीस अधिकारी गेली दहा ते पंधरा वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर इतर विभागांमध्ये असल्याचे समोर आले.