Maharashtra Mega Bharti | राज्यात लवकरच Mega Bharti, CM चा 150 दिवसांचा कार्यक्रम
abp majha web team | 08 Jul 2025 05:22 PM (IST)
राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर Mega Bharti प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतरच राज्यात व्यापक Mega Bharti प्रक्रिया सुरू करण्यात येईल. दीडशे दिवसांच्या या कार्यक्रमात आकृतीबंधातील सुधारणा, नियुक्ती नियमांचं अद्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्वावरील शंभर टक्के भरती पूर्ण करणे यासारखी महत्त्वाची उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत. ही उद्दिष्टं पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांची अचूक माहिती समोर येईल. त्यानंतरच राज्य सरकार Mega Bharti साठी पुढील पाऊल उचलेल. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येऊन पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवता येईल अशी अपेक्षा आहे. सध्या विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही Mega Bharti प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होईल.