Navi Mumbai International Airport Name : माझा विशेष : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुणाचं नाव?
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2021 05:36 PM (IST)
नवी मुंबई : दि बा पाटील (Di Ba Patil) यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport)देण्यात यावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कळवा नाका आणि कळवा नाका इथपासून ते नवी मुंबई पर्यंत साखळी आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.