Sharad Pawar On Majha Maha Katta : पवारांची भूमिका काय आहे? आरक्षणाच्या मुद्यावर पवार म्हणाले...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar On Majha Maha Katta : पवारांची भूमिका काय आहे? आरक्षणाच्या मुद्यावर पवार म्हणाले...
मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली! मी लोकांशी संवाद साधणार आहे "महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.