Dr Sanjay Borude Majha Katta : मुलं गुटगुटीत म्हणजे धोका आहे का? लठ्ठ आहे की नाही कसं ओळखायचं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDr Sanjay Borude Majha Katta : मुलं गुटगुटीत म्हणजे धोका आहे का? लठ्ठ आहे की नाही कसं ओळखायचं?
लठ्ठपणा म्हणजे आजारांना निमंत्रण असं का म्हणतात?
वाढता लठ्ठपणा लहान मुलांच्या आरोग्याला किती धोकादायक?
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खायचं?
कसं खायचं? किती खायचं? आणि कधी खायचं?
कोणते उपचार घ्यायचे? प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया....
लठ्ठपणाच्या आजारावर उपचार करणारे
विख्यात डॉक्टर संजय बोरुडे डॉ.संजय बोरुडे माझा कट्ट्यावर
लठ्ठपणाची कारणं कोणती?लठ्ठपणाची कारणं विचारली असता डॉ. संजय बोरुडे म्हणाले की, "बालपणातील लठ्ठपणाची कारणं वेगळी असतात. जन्मल्यापासून मुलांमध्ये स्थूलपणा येऊ शकतो. अनुवांशिकता हे पण लठ्ठपणाचं कारण आहे. आई आणि वडील लठ्ठ असले तर बाळही लठ्ठ होण्याचं शक्यता वाढते. तर मुलं 24 तासातील 8 ते 9 तास शाळेत घालवतात. शाळेतील वातावरण किती पोषक आहे आणि किती नाही यावरही लठ्ठपणा अवलंबून असतो. तसंच जंक फूड, मुलांना खेळायला जागा नाही, अभ्यासातील नंबर गेम्समुळे मुलांवरील ताण यामुळेही लठ्ठपणा येऊ शकतो."