Majha Katta Arjun Dangle :कसा झाला दलित पॅंथरचा जन्म?दलित संघटनांचं राजकीय भविष्य काय? अर्जुन डांगळे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Katta: ज्येष्ठ विचारवंत कवी, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांनी 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी दलित साहित्य, आंबेडकरी चळवळ आणि दलित पँथरचा जन्म कसा झाला? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात बोलताना दलित पँथर बद्दल त्यांनी सांगितले की, ''दलित पँथरने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला एक वळण दिलं आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा सत्याग्रह केला, तो रायगड येथे चवदार तळ्याचा. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हे सत्याग्रह केलं. अशा या महाराष्ट्रातच दलित पँथर वाढली, याचे कारण म्हणजे आम्हाला लहानपणापासून हे बाळकडू मिळालं आहे. महाराष्ट्रात 70 च्या दशकात दलितांवरील अन्याय वाढले होते. त्यावेळी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली होती. आम्हीही सर्व लिहते होतो.