Majha Katta : माझा कट्टा : पाकिस्तानी लेखक-पत्रकार तारेक फतेह माझा कट्ट्यावर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Sep 2022 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिजाब घातला नाही म्हणून इराणमध्ये पोलीसांनी अटक केलेल्या तरूणीचा मृत्यू झाला आणि अवघ्या इराणमध्ये हिजाबबंदीची मागणी करत महिला रस्त्यावर उतरल्या.. त्यांचं हे आंदोलन सध्या जगभरात प्रमुख चर्चेचा मुद्दा आहे. या निमित्ताने इस्लाम आणि इस्लामिक परंपरा यावर जगभरात चर्चा सुरू झाल्यात.. भारतातही गेले अनेक दिवस हिजाबच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा होतायत... हिजाबबद्दलच्या आणि भारतातील एकुण मुस्लीम समुदायाच्या विचारसरणीबाबत कायम वेगळी आणि आग्रही भुमिका मांडणारे एक नाव या सगळ्या परिस्थितीत सहज नजरेसमोर येतं आणि ते म्हणजे पत्रकार आणि लेखक तारेक फतेह..संपूर्ण भारतात हिंदुत्ववादाचं वातावरण गडद होत असतानाहीे आपल्या मुद्द्यापासून तसूभरही न हललेले तारिक फतेह आजचे आपल्या कट्ट्य़ावरचे पाहूणे आहेत