Maxin Mavshi ; Majha Katta: मॅक्सिन बर्नसन ते मॅक्सिन मावशी;मराठीप्रेमी मॅक्सिन मावशी माझा कट्ट्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : देशातील पालकांचा इंग्रजी माध्यमामध्ये ओढा जास्त आहे. मातृभाषा शिकताना मुलांना इंग्रजी भाषेची तोंडओळख पाहिजे. भाषा शिकणे अवघड नाही त्यासोबत लेखन, वाचन देखील गरजेचे आहे. मुलांचे मातृभाषेवरील प्रभुत्व देखील चांगले राहिले पाहिजे याची काळजी घेतली. नोकरी मिळते पण मुलांना आपल्या मातृभाषेविषयी आस्था राहत नाही. भाषेचा अट्टहास हा संस्कृती जपण्यासाठी नाही संवाद वाढविण्यासाठी केला पाहिजे असे मत मॅक्सिन मावशींनी व्यक्त केले आहे. मॅक्सिन मावशी आज माझा कट्ट्यावर बोलत होत्या.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपलं आयुष्य समर्पित केले आहे. मॅक्सिन मावशी पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात इंग्रजीचे महत्त्व खूप आहे. मातृभाषेबरोबरच इंग्रजी देखील मुलांना शिकवता येते. विदयापीठामध्ये जे शिक्षक आहे. त्यांना इंग्रजी बरोबर भारतीय भाषा येणे सक्तीचे केले पाहिजे. भारतीय भाषा सर्वांना येणे गरजेचे आहे.