Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर

अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दिप्ती आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत.. या दोघांचंही आजचं इथे येणं खास आहे.
१४ डिसेंबर ला श्रेयसला शूटिंग च्या वेळीच हृदय विकाराचा झटका आला होता..हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबला होता, हृदय बंद पडलं होतं..वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर तो क्लिनिकली डेड होता.
पण झुकेगा नही म्हणत श्रेयस त्या जीवघेण्या संकटातून, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलाय... आज तो आपल्यासोबत गप्पा मारणार आहे, त्यामुळे श्रेयस सगळ्यात आधी वेलकम बॅक... म्हणजे कट्टयावर सुद्धा आणि नव्या आयुष्यात सुद्धा.. आणि या सगळ्यात दिप्तीने, श्रेयसच्या बायकोने त्याला प्रचंड खंबीर साथ दिलीये आणि श्रेयसही म्हणतो की त्याला मिळालेला नवा जन्म दिप्तीमुळेच आहे. त्यामुळे दिप्ती तुझंही खूप स्वागत
सध्या दुर्देवानं आपण अनेकदा अनेक गोष्टी गृहित धरतो.. आपली माणसं, आपलं काम, आजूबाजूची परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरिर,आपलं आरोग्य... माझ्या तब्येतीला काय होतंय, मी थोडी ना आजारी पडणार आहे? हा तब्येतीच्या बाबतीतला ओव्हरकॉन्फिडन्स कधी कधी खूप महागात पडतो.
छोटे मोठे आजार अंगावर काढणं आपल्याकडे नॉर्मल समजलं जातं... हेल्थ इज वेल्थ असं आपण नेहमी म्हणत असलो तरी तितक्याच सहजपणे आरोग्याकडे दुर्लक्षही करतो.
फिटनेस फ्रीक्र असणाऱ्या, व्यसनापासून दूर राहणाऱ्या, नेहमीच चार्मिंग आणि उत्साही असणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका यावा ही गोष्ट अनेकांसाठी शॉकिंग होती. पण आता तो पूर्ण बरा आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत तो कामाला सुरुवात करतोय. महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा नवा सिनेमा ही अनोखी गाठ लवकरच प्रदर्शित होतोय. या सिनेमाबद्दल तर बोलणारच आहोत पण हृदयविकाराचा झटका आलेला १४ डिसेंबरचा ते आजचा दिवस श्रेयस आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य कसं बदललं, या काळाने त्यांना काय शिकवलं या सगळ्याबद्दलही दिप्ती आणि श्रेयसशी संवाद साधुया
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- माझा कट्टा
- Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर