Ashish Shelar Majha Katta Full : काँग्रेस ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर, आशिष शेलार यांची स्फोटक मुलाखत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshish Shelar on congress bharat jodo yatra : भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शेलार यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) आज ज्या टप्प्यावर आहे ते पाहता यात राज्याला स्थैर्य देऊन सरकार चाललं पाहिजे आणि राज्याचं भलं झालं पाहिजे. यासाठी भाजप खूप सजग आहे आणि यासाठी नेतृत्व करायला भाजप तयार आहे. काँग्रेसचं भारत जोडोचा पहिला टप्पा नांदेडपासून सुरु होतोय. दुसरा टप्पाही सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यापर्यंत त्यांचे दोन टप्पे पडलेले दिसतील. पहिल्या टप्प्यात जे उर्ध्वयू म्हणून नेतृत्व करत आहेत ते दुसऱ्या टप्प्यात त्यातलेच दुसऱ्या टप्प्यात कुठल्या टापूवर बसलेले दिसतील हे महाराष्ट्राला दिसेल. उखाण्याने नावं घेण्याची वेळ नाही, असंही ते म्हणाले.