Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा शिवसेना आमदार अपात्रता याचिका निकालात (Shiv Sena MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष असल्याचा निकाल देत भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवली. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाची 2018 मधील नवीन घटना सादर केली नसल्याच्या मुद्यावर नार्वेकर यांनी हा निकाल दिला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांचा दावा खोटा असल्याचे सांगत निवडणूक आयोगात कोणती कागदपत्रे दिली, याचे पुरावेच सादर केले. अनिल परब यांनी 'माझा कट्टा'वर हे पुरावे सादर करत नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचे आरोप केला.