Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 06 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार.
रायगडावर अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी, ((एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल,)) गडावर 5 लाखांहून अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याची माहिती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण.
महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सूतोवाच. केंद्रीय नेतृवाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार, देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य.
संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला, महाराष्ट्रात अपेक्षीत यश मिळालं नाही, पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं वक्तव्य.
भाजप नेत्यांकडून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु, मात्र जबाबदारीतून मुक्त करा या भूमिकेवर फडणवीस ठाम असल्याची माहिती.