Rekha Jare |अहमदनगरमधील रेखा जरे हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होताच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे फरार
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2020 09:29 PM (IST)
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आले आहे. बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधिक्षक, मनोज पाटील यांनी दिली आहे. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.