...तर शिल्लक साखर समुद्रात बुडवावी लागेल- गडकरी | सांगली | एबीपी माझा
महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन झालंय की, शिल्लक राहिलेली साखर समुद्रात बुडवावी लागेल, त्यामुळे उसाची शेती करणं बंद करा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगलीत बोलताना केलंय. साखरे ऐवजी इथेनॉलचे उत्पादन घ्यायला सुरु करा असंही गडकरींनी म्हटलं आहे. “तुमच्यात जेवढा दम असेल तेवढं इथेनॉल बनवा 54-55 लीटरच्या भावाने सरकार विकत घ्यायला तयार आहे.” असे भाष्य गडकरींनी केले.