अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्ण गोस्वामींच्या अडचणीत भर, दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2020 08:10 PM (IST)
साल 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने अलिबागमधील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाईक यांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी फेरतपासाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याने रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांना मुंबईतून अटकही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गोस्वामी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.