Terrorist Encounter | पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून चीनी बनावटीची हत्यारं जप्त,4 दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम Updated at: 19 Nov 2020 03:56 PM (IST)
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांधली चकमक संपली आहे. हे चारही दहशतवादी ट्रकमध्ये लपले असल्याचा दावा लष्कराने केला आहे. सध्या शोधमोहीम सुरूच आहे. खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.