VIDEO | 'लकी' सिनेमावर फिल्मी एक्सरे | रिव्ह्यू | पिक्चर बिक्चर | एबीपी माझा
संजय जाधव यांचा सिनेमा असला की या सिनेमात अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर अशी चमचमती मंडळी असतात. त्यांचा सिनेमाही तसाच मसालेदार. पण लकी त्याला अपवाद होता. या सिनेमात त्यांनी अभय महाजन आणि दिप्ती सती या जोडीला घेऊन मोठा सुखद धक्का दिला. आता काहीतरी गमतीदार पाहायला मिळणार असं कुतूहल निर्माण होतं. पण लकी चित्रपट सुरू झाल्यापासून प्रेक्षकांवर एकामागेएक फ्रेम्स आदळू लागतात आणि या सिनेमातली, गोष्टीतली मजा निघून जाऊ लागते. सिनेमावर तंत्र प्रभाव गाजवू लागतं. छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत या इतर अंगांनी हा सिनेमा पहिल्यापासून इतका लाऊड होतो की यात इमोशन्स नावालाही उरत नाहीत. पर्यायाने ही गोष्ट आणि त्यातला सगळा पसारा कोरडा, नाहक वाटू लागतो.