VIDEO | कॉंग्रेसचा जाहीरनामा, गरिबीवर हमला की चुनावी जुमला? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2019 08:18 PM (IST)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे काँग्रेस सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलमच रद्द करणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, शेती आणि उद्योग क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांसाठी 'न्यूनतम आय योजना' अर्थात 'न्याय' सुरु करण्याचं वचन दिलं आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला 'जन आवाज' हे नाव दिलं आहे.