Breakfast Chat | माझा उल्लेख माहेरवाशीण असा केला तरी असा भाऊ कोणत्याच बहिणीला नको : दीपाली सय्यद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2019 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच सगळ्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली असणार. यंदा राज्यात गाजलेल्या लढतींपैकी एक लढत म्हणजे मुंब्रा- कळवा मतदार संघातील. कारण, ही लढत आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यातली.
दिपाली सय्यद यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नशीब आजमावलं होतं. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. नंतर दिपाली सय्यद शिवसंग्राम पक्षात गेल्या. नुकतंच त्यांनी नगर जिल्ह्यात पाणी योजनेसाठी केलेलं आंदोलन आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी शिवबंधन हाती बांधलंय..ही विधानसभेची लढत नेमकी कशी रंगली, प्रचार कसा पार पडला, अभिनेत्री ते शिवसेना उमेदवारापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला हे आपण दिपाली सय्यद यांच्याकडून जाणून घेणार आहोत..दिपालीताई तुमचं स्वागत आहे या गप्पांमध्ये...