Breakfast News | राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2019 12:09 PM (IST)
लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाआघाडीसाठी धक्कादायक ठरले. त्यातही राज्याचा विचार केला तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी काँग्रेस पक्षाला ज्या एका उमेदवारानं वाचवलं ते म्हणजे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर. केवळ वाचवलं नाही तर धानोरकर यांनी चंद्रपुरातून अशी काही बाजी मारली की केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहीर यांना पराभूत केलं.
शिवसेनेला रामराम ठोकून ऐन निवडणूक काळात काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश धानोरकर हे या निकालातून काँग्रेससाठी मोठा आधार ठरले. केंद्रीय राज्यमंत्र्यांना हरवणारा त्यांचा विजय नक्कीच महत्वाचा ठरतो. इतरत्र काँग्रेसची वाताहत झालेली असताना चंद्रपुरात काँग्रेसचा हात मतदारांनी का सोडला नाही. आपण थेट विचारणार आहोत सुरेश धानोरकर यांना.