ब्रेकफास्ट न्यूज | अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याशी खास बातचित

सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्याची रोजची जिवघेणी स्पर्धा असते, त्या सिनेसृष्टीत अव्याहत २ दशकांहून अधिक काळ आपलं स्थान राखणं ही सोपी गोष्ट नाही. पण ही गोष्ट अगदी सहजसोपी आहे अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासाठी.  एकापेक्षा एक उत्तमोत्तम सिनेमांमधून रसिकांना आपलसं करून त्यांनी अमेरिका गाठली.. आणि रसिकांनाही धक्का बसला.. पण फिरूनी नवे जन्मेन मी, असंच काहीसं होतं अश्विनी भावे परत परत भेटत राहिल्या नवनव्या प्रयोगांमधून. अभिनेत्री ते निर्माती, दिग्दर्शक अशा सिनेमांतील सगळ्यांच बाजू त्या समर्थपणे पेलू लागल्या. आणि येत्या भारतभेटीत नवं काय असा सहाजिक प्रश्न प्रेक्षकांना पडू लागला. आणि आज आपल्यासोबत आहेत ब्रेन अँड ब्युटीचं अफलातून कॉम्बिनेशन असलेल्या अश्विनी भावे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola