VIDEO | महामानव साकारणाऱ्या अभिनेता सागर देशमुखसोबत खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

ज्या अभिनेत्याला नाटकाची पार्श्वभूमी असते त्याच्या अभिनयात नेहमीच वेगळेपण जाणवतं. आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अशा एका अभिनेत्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत जो आपल्याला नेहमी वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसला. हिंदी चित्रपट हंटर ते मराठीमधील YZ या सिनेमांमध्ये हलक्या फुलक्या भूमिकेत रसिकांसमोर आलेला सागर देशमुख आज आपल्यासोबत आहे. पण सागरची अभिनयाची रेंज जबरदस्त आहे. अनेक प्रयोगिक नाटकांमधुन सागर आपल्याला भेटलेलाच 

पण चित्रपटातील हलक्या फुलक्या भूमिकेतनंतर सागरनं प्रेक्षकांची मनं जिंकली ती भाई सिनेमांत पु.ल. देशपांडे यांची भूमिका सशक्तपणे साकारून. आणि आज त्याला बोलावण्याचं निमित्त हे त्याच्या आणखी एका महत्वाच्या प्रयोगाचं. कारण सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होतेय. . या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सोनेरी पानं प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola