TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 12 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेच्या जागेसाठी उद्या उमेदवारी जाहीर करणार. सुनील तटकरेंची पत्रकार परिषदेत माहिती, , सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळांचं नाव चर्चेत.
कोकण पदवीधर मतदार संघातील मविआचा तिढा सुटला, ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे अमित सरै यांचा अर्ज मागे, मविआकडून काँग्रेसचे रमेश कीर आता रिंगणात.
कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत.
मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपसह शिवसेनेचाही उमेदवार, भाजपकडून किरण शेलार, शिवसेनेकडून दीपक सावंत तर ठाकरे गटाचे अनिल परब निवडणुकीच्या रिंगणात, त्यामुळे मुंबई पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रकाश सोनवणेंची माघारा, भाजपचे शिवनाथ दराडे ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे यांच्यात चौरंगी लढत.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्यात लढत.