TOP 50 : सकाळच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सुनावणी होणार.
अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं, ओबीसीच्या बैठकीसाठी लक्ष्मण हाके अंबडला रवाना.
हे माझं शेवटचं उपोषण, यानंतर विधानसभेला उमेदवार उतरवणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशार.
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे आणि शिवाजी राजे जाधव यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंच्या तब्येतीची केली विचारपूर.
खासदार बजरंग सोनवणे यांचं राज्यपालांना पत्र, मनोज जरांगेंचं पाच दिवसांपासून उपोषण सुरु, त्यांच्या जिवीतास काही झालं तर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, राज्य शासनाला तत्काळ आंदोलनाची दखल घेण्यास सांगावं, सोनवणेंची पत्राद्वारे मागणी.
मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर, त्यांच्या मागण्यावर काम सुरु आहे, दिलेल्या आश्वासनानुसार केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया.