Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतपत्रिकांची छाननी पूर्ण, 6 हजार 684 मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती.
सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरेंच्या युवासेनाचा आतापर्यंत ७ जागांवर विजय, अजून ३ उमेदवारांच्या निकालाकडं लक्ष.
नवी मुंबईमधील बोगस पोलिंग एजंट प्रकरणात अभाविपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार, मतदानाच्या दिवशी वाशीच्या मतदान केंद्रावर युवा सेनेचा बोगस प्रतिनिधी सापडल्याचा अभाविपचा आरोप.
सिनेट निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, बोगस पोलिंग एजंट प्रकरणी विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवारला हायकोर्टाकडून नोटीस जारी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी.
उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ, तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर इनपूट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य.
तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबीयांशी पोलिसांकडून संपर्क, पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईत बोलावलं, महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही.
पास न काढता सचिव गेटनं महिलेनं मंत्रालयात प्रवेश मिळवल्याची माहिती, उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल((, हे कृत्य करणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु)).
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबीन तोडफोडप्रकरणी मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता.