VIDEO | माजी रणजीवीर पद्माकर शिवलकर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन | मुंबई | एबीपी माझा

मुंबईचे माजी रणजीवीर पद्माकर शिवलकर यांच्या 'हा चेंडू दैवगतीचा' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा काल सायंकाळी मुंबईत संपन्न झाला. माजी कसोटीवीर चंदू पाटणकर आणि अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं. शिवलकर यांनी आपल्या कारकीर्दीत प्रथम दर्जाच्या १२४ सामन्यांमध्ये तब्बल ५८९ विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola