Anandache Paan : लेखक नील नेथन आणि लेखिका गार्गी सहस्त्रबुद्धे यांच्या सोबत खास गप्पा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Paan : लेखक नील नेथन आणि लेखिका गार्गी सहस्त्रबुद्धे यांच्या सोबत खास गप्पा
हेही वाचा :
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात महिला अत्याचारावरील गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागले. आता महिला अत्याचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महत्त्वाचे भाष्य केले आहे. महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही सुटता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रम पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आज तिन्ही सैन्य दलात महिला अधिकारी आहेत. फायटर, पायलट महिला बनत आहेत. नारिशक्ती नवा कायदा बनवला. राजकारणात महिलांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सुरक्षेसाठी महत्व दिले.
महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार राज्यासोबत
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नये. पोलीस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहे. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई-एफआयआर सुरू केल्या आहे. याने गडबड होणार नाही, आता जलद प्रतिसाद मिळेल. फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.