VIDEO | मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यातून? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 13 Apr 2019 08:15 PM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा आज होत आहे. एकीकडे या सभेच राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाला वेगळाच प्रश्न सतावत आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.