VIDEO | दहशतवादाचे आरोप असणाऱ्या साध्वीला उमेदवारी का? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2019 07:30 PM (IST)
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनीही साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. भोपाळच्या भाजप उमेदवार 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. खटला अजून प्रलंबित आहेत. भाजप धर्माच्या आधारावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तहसीन पूनावाला यांनी केली आहे.