माझा हस्तक्षेप | सय्यद मतीनला वाजपेयींची अॅलर्जी का?
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2018 10:38 PM (IST)
देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ राजकारणी अटल बिहारी वाजपेयी काल अनंतात विलीन झाले.. देशभर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येतेय.... औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण असाच श्रद्धांजली प्रस्ताव काल मांडण्यात आला... महापौरांनी प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावास एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं या विरोध दर्शवला. त्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी सय्यद मतीनला चपलेनं तसंच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारलं. त्यानंतर सय्यद मतीन याचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी इतर नगरसेवकांनी केली. यानंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. एकीकडे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व, असे राजकारणी ज्यांनी उभ्या आयुष्यात लोकशाहीसाठी चुकीचे पायंडे पाडणं टाळलं ते अनंतात विलीन होत असताना देशातल्या एका लोकशाहीच्या सदनात हा काय प्रकार घडत होता... अटलजींसारख्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यास विरोध करायची हिम्मत कशी होते, आणि अशा विरोध व्यक्तीला चोप दिला तर चुकलं कुठे