712 | मान्सून अपडेट
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2018 08:22 AM (IST)
राज्यावरील मान्सूनचे ढग आता विरळ झालेत. राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडं वातावरण बघायला मिळालं. कोकणात काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. तसच विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित पाण्याची पाळी देण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय. येत्या २४ तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.