712 | वाशिम : पावसामुळे सुमारे 13 हजार हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2018 10:10 AM (IST)
एकीकडे पिकांवर किड-रोगांचा प्रादुर्भाव होतोय, तर काही ठिकाणी मात्र अतिपावसानं पीक हातचं जातंय. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात कित्येक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. वाशिममध्येही नद्या-नाल्यांचं पाणी शेतांमध्ये शिरल्याने उभं पीक जमीनदोस्त झालं आहे.