शेतकऱ्याच्या मनीऑर्डरची पंतप्रधान कार्यालयातून दखल | 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2018 08:57 AM (IST)
कांद्याचे दर घसरल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आलंय. केवळ एक ते दोन रुपये प्रति किलोचा दर सध्या कांद्याला मिळतोय. या परिस्थितीची पंतप्रधांपर्यंत पोहोचावी यासाठी निफाडच्या संजय साठे या शेतकऱ्यानं पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर पाठवली होती. साधारण साडे ७ क्विंटल कांद्या विक्रीतून मिळालेले १ हजार ६४ रुपये स्वतःचे ५४ रुपये अधिक खर्चून त्यांनी पंतप्रधानांना पाठवले. याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयानं कांदा प्रश्ना विषयी संपूर्ण माहिती मागवलीये. यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा अहवालही पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आला.