712 | खरीप हंगामात राज्यात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2018 08:27 AM (IST)
राज्यातील शेतकऱ्य़ांची खरिपातील पेरणी जवळपास पूर्ण होताना दिसतेय. काही भागांमध्ये पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. कापसासारखी पिकं फुलोरा, तर मूग आणि उडदासाऱखी पिकं शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ९७ टक्के क्षेत्रावर खरिप पेरणी पूर्ण झालीये.