712 | राज्यातील डाळिंबाचा कॅलिफोर्निया संकटात, तेल्या रोगामुळे नुकसान | सोलापूर | एबीपी माझा
दुष्काळाच्या झळांमध्ये सगळीच पिकं होरपळून निघत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं कोटींच्या घरात नुकसान होत आहे. सोलापूरच्या अजनाळे गावाची हीच अवस्था झाली आहे. डाळिंबाच्या भरघोस उत्पादनामुळे या गावाला राज्यातील कॅलिफोर्निया असं संबोधलं जातं. मात्र दुष्काळ आणि तेल्या रोगामुळे इथली 60 टक्के डाळिंब बाग नष्ट झाली आहे.