712 | दिल्ली | डेअरीसाठी 51 हजार कोटींची गुंतवणूक गरजेची - केंद्रीय कृषिमंत्री
केंद्र सरकारनं दूध उत्पादकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय डेअरी कृषी आराखडा-२०२२ तयार केला. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारला ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकासासाठी १० हजार ८८१ कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यातील ४४० कोटी वितरीत केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या निधीच्या माध्यमातून देशातील ५० हजार गावातील ९५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.