किनारपट्टी भागात मसाला पिकांची यशस्वी शेती | 712 | पालघर | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2018 09:15 AM (IST)
पालघर जिल्ह्याची ओळख आदिवासी बहूल जिल्हा अशी आहे. इथला शेतकरी पारंपरिक पद्धतीने फक्त भातशेती करतो. मात्र माहिममधील जयंत राऊत यांच्या नारळाच्या बागेत वेगळंच चित्र दिसतं. दालचिनी, तमालपत्र, लवंग अशा मसाला पिकांची लागवड त्यांनी केली आहे. आपल्या वडिलांनी रुजवलेल्या मसाला पिकांची देखभाल तर ते करतातच, पण त्यांच्या रोपांचीही विक्री करतात.