Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
पुण्यात जे घडलं त्याला बदला काँग्रेसनं नागपूरमध्ये घेतला का, असा सवाल सध्या विचारला जातोय. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यासाठी चर्चा सुरु होत्या. मात्र पहाटे ही चर्चा बिनसली आणि काँग्रेसचे स्थानिक नेते नॉट रिचेबल झाले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केला. नेमक्या कुठल्या मुद्द्यावरून आघाडी तुटली, त्यानंतर काँग्रेसनं काय केलं आणि नागपूरमध्ये पुढच्या दोन दिवसात काही मविआच्या समीकरणात काही बदल घडू शकतात का, याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये.
अनिल देशमुख बोलतायत नागपूरमधील काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल.
शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असलेली चर्चा अखेर मंगळवारी पहाटे फिस्टकली आणि नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली.
जागावाटपाच्या वाटाघाटी यशस्वी न होणं, एवढं एकच कारण या फाटाफुटीमागं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.
तर यामागे असेलल्या कारस्थानाचा वास येत असल्याचा दावा देशमुखांनी केलाय.