712 | बीड | महिना होत आला तरीही ऊसतोड कामगारांचा संप सुरुच
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2018 08:22 AM (IST)
मजुरांची सगळ्यात जास्त गरज ऊसतोडणीसाठी असते. ऊसाच्या तोडणीपासून कारखान्यात नेईपर्यंत शेतकऱ्यांना मजूरांची गरज भासते. मात्र या ऊस तोड कामगारांच्याही काही समस्या आहेत. राज्यात बीड, जळगाव, धुळे, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार भटकंती करत असतात. तोडणीसाठीचा दर वाढवण्यासाठी ऊसतोड कामगारांनी संप पुकारलाय. गेल्या महिनाभरापासून त्यांचा हा संप सुरुये.