712 | बीड | पावसाच्या खंडामुळे पिकं काढून टाकण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2018 09:57 AM (IST)
पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस होत असला, तरी मराठवाड्यातील काही भागांकडे पावसानं पाठ फिरवलेली दिसतेय. बीड, उस्मानाबाद, परभणी अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवलाय. पावसाअभावी पिकं वाळून गेल्यानं शेतकऱ्याना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.