बीडच्या गेवराईमध्ये राज्यस्तरिय कृषी प्रदर्शन | 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम Updated at: 13 Dec 2018 10:36 AM (IST)
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी प्रदर्शनांचं आयोजन केलं जातं. बीडमधील गेवराईमध्ये अशाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चार दिवसीय प्रदर्शनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. किसान विकास कृषी प्रतिष्ठानच्या वतीने हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. गेल्या 11 वर्षांपासून किसान विकास प्रतिष्ठान या कृषी महोत्सवाचं आयोजन करतायत. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाणी संवर्धन, सेंद्रीय शेती, वेगवेगळी अवजारे यांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी असे कृषी प्रदर्शन गरजेचे असल्य़ाचं मत यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.